प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 राज्यात राबविणेबाबत

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 व रबी हंगाम 2020-21 पासुन तीन वर्षाकरीता राज्यात राबविणेस मान्यता
पिकविमा टेक्निकल सपोर्ट ग्रुप
https://rzp.io/l/Pikvima

Join us on Whatsapp
Bit.lt/cscvlemitrajoin

सन २०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे पिकांना विमासंरक्षण मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे.
शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा पीकविमा योजनेत समावेश आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने, भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमाहप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे.या पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र , CSC सेंटर्स किंवा ज्या बँकेत शेतकऱ्यांना कर्ज खाते आहे त्या  बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी सोबत सातबारा, आधार कार्ड, पिकांच्या पेरणीबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी शासन निर्णय वाचा👇

 



पिकविमा टेक्निकल सपोर्ट ग्रुप
https://rzp.io/l/Pikvima

Join us on Whatsapp
Bit.lt/cscvlemitrajoin

पिकविमा फॉर्म्स साठी भेट द्या

Post a Comment

0 Comments