✍️ केंद्र सरकारच्या 06 फेब्रुवारी 2020 च्या निर्देशानुसार सर्व *'पी.एम.- किसान' (KCC)* लाभार्थ्यांसाठी *' पिक कर्ज मोहीम'* सुरू केली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती...
Kisan Credit Card KCC 2020 किसान क्रेडिट कार्ड योजना
✍️ प्रधानमंत्री किसान (पंतप्रधान-किसान) सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना के.सी.सी. म्हणजेच *किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) चे* लाभ देण्यासाठी मिशन मोडमध्ये एक मोहीम सुरू केली गेली आहे. ही मोहीम पुढील १५ दिवस चालविली जाईल, ज्या अंतर्गत पंतप्रधान-किसान लाभार्थ्यांना केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) चा लाभ घेण्यासाठी जागरूक केले जाईल.
✍️ केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने भारत सरकारने *'पंतप्रधान-किसान सन्मान निधी'* योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी मिशन मोड सुरू केला आहे.
✍️ राज्यात किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) अभियान सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून या योजनेतील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पिके आणि जनावरे / मत्स्यपालनांच्या गरजेसाठी जास्तीत जास्त व्याजदराने ४ टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.
✍️ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नोंदणी झालेली आहे त्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहेत. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आहे.
✍️ KCC कार्ड असेल तर शेतकरी जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कर्ज घेऊ शकतात. या कर्जावर आकारले जाणारे व्याज देखील कमी आकारले जाते आणि जर शेतकऱ्यांनी आपल्या लोणची परतफेड वेळेत केली तर त्यांना सूट देण्यात येते आणि राहिलेल्या रकमेवर कमी व्याजदर आकारला जातो.
✍️ शेतकऱ्यांना शेती करताना विविध गोष्टींच्या खरेदीसाठी आर्थिक मदत हवी असते यामध्ये बी, बियाणे खरेदी, कीटकनाशके, खते इत्यादीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत घेण्यासाठी इतर स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. यासाठीच भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड ही संकल्पना सुरू केली आहे, यामुळे शेतकरी यांना जलद कर्ज मिळेल.
✍️ किसान क्रेडिट कार्ड योजनेची प्राथमिक उद्दिष्टे काय ते पाहूया :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये नावं असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शासनातर्फे किसान क्रेडिट कार्डव्दारे रुपये ३ लाखपर्यंतचे कर्ज सोबतच २ लाख रुपयांचे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा कवच.
✍️ उपलब्ध सुविधा :-
● नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज...
● जुन्या किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा वाढवणे...
● जुने बंद पडलेले किसान क्रेडिट कार्ड सुरू करणे...
✍️ नवीन किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारे कागदपत्रे :-
● आधारकार्ड
● सातबारा-होल्डिंग
● मोबाईल नंबर
● कर्जखात्याचा तपशील
✍️ किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी पात्रता :-
- किसान कार्ड किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी सर्व शेतकरी पात्र आहेत ज्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये नाव नोंदणी केलेली आहे.
- आपल्याला किसान क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर संबंधित बँकेला भेट द्यावी.
- किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मधील रक्कम ज्या बँकेत जमा होते त्या बँकेशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
- संबंधित बँकेच्या वेबसाईटवर अर्ज नमुना आहे तो डाऊनलोड करून संपूर्ण माहिती भरुन तो लोन ऑफिसर यांच्याकडे जमा करावा.
- KCC साठीचा अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
- बँकेचे लोन ऑफिसर सर्व बाबींचा तपास करुन किसान क्रेडिट कार्डची लिमिट ठरवतील.
- जर १ लाख ६० हजार पेक्षा जास्त लिमिट असेल तर तुम्हाला सिक्युरिटीसाठी तारण म्हणून आपली जमीन किंवा इतर मालमत्ता मोरगेज म्हणून द्यावी लागेल
- या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर आपणास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
✍️ दुसरा पर्याय :- आपण आपल्या नजीकच्या CSC सेंटर ला भेट देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत KCC साठी ऑनलाईन अर्ज भरू शकता, त्यासाठी आपण आपले आधार कार्ड, बँक पासबुक, सात बारा, आठ अ कागद पत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता .
✍️ किसान क्रेडिट कार्ड योजनेची वैशिष्ट्ये :-
- किसान क्रेडिट कार्ड ही प्रक्रिया अगदी जलद होणारी आणि साधी सोपी प्रक्रिया आहे.
- हि प्रक्रिया शेतकऱ्यांना निधीची उपलब्धता जलद आणि वेळेवर उपलब्ध करून देते.
- यात किमान कागदपत्र यांची आवश्यकता भासते जसे कि आधार कार्ड, जमिनीची कागदपत्र इत्यादि.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये शेतकऱ्याला विमा संरक्षण देखील दिले जाते .
- राष्ट्रीय पीक विमा योजनेत केसीसी साठी पात्र पिकांचा समावेश आहे.
- पिकाच्या हंगामात ही योजना शेतकऱ्यांना काही प्रमाणात संरक्षण देते
✍️ काय आहे " कोलॅटरल सेक्युरिटी फॉर केसीसी लोन " :-
- आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किसान क्रेडिट कार्ड वर घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी सिक्युरिटी म्हणजे सुरक्षेसाठी व्यापक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातात
- उदाहरणार्थ एसबीआय बँकेसाठी जर आपण १ लाखापर्यंत लोन घेतले तर त्याला कोणतीही कोलॅटरल सिक्युरिटी देण्याची गरज नाही म्हणजेच SBI १बँक १ लाखापर्यंतच्या कर्जावर आपल्याला कोणत्याही प्रकारचे जमीन तारण द्यावे लागत नाही.
✍️ किसान क्रेडिट कार्ड कर्जाचा व्याजदर हा बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या निर्णयावर अवलंबून आहे त्यामध्ये संबंधित बँका वेळोवेळी बदल करू शकतात. बऱ्याच बँका कर्ज देत असताना शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या प्रोसेसिंग फी माफ करतात. एसबीआय 3 लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारत नाही .
✍️ सरकारने तीन लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर घेण्यात येणारी सर्व प्रोसेसिंग की इन्स्पेक्शन आणि लेझर फोलिओ चार्ज माफ केलेला आहे.
✍️ किसान क्रेडिट कार्ड जर आपण बनवले तर त्या शेतकऱ्याला तीन लाखा पर्यंतचे लोन ७ टक्के व्याजाने मिळेल आणि जर ते लोन वेळेत परतफेड केली तर शेतकऱ्यांना ३ टक्के व्याजदराची बचत होईल म्हणजेच त्यांना लोन हे ४ टक्के दराने मिळेल.
✍️ यापूर्वी कोणतेही जमीन तारण न देता १ लाख रुपये पर्यंतचे लोन मिळत होते परंतु याची मर्यादा वाढवून १ लाख ६० हजार रुपये करण्यात आलेली आहे.
✍️ पशुपालन आणि मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डद्वारे २ लाख रुपयापर्यंतचे कर्ज ४ टक्के व्याजदराने दिले जाईल. सरकारने पशुपालन आणि मत्स्य शेती या विभागातील शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केले आहे.
✍️ शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर १४ दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड त्यांना प्राप्त होईल. सरकारच्या निर्देशानुसार बँकांनी सदरील शेतकऱ्यांचा सातबारा, आठ अ इ. जमिनीचे कागदपत्रे आणि आधार कार्ड यांचे व्हेरिफिकेशन करून १४ दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे
KCC चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
*किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती - http://bit.ly/32oHRBH
CSC CENTER साठी :-
- किसान क्रेडिट कार्ड डिजिटल सेवा लॉगिन पेज
- KCC चे स्टेटस चेक करा
- KCC REPRINT करण्यासाठी क्लिक करा
KCC CONTACT :-
Ministry of Electronics & Information Technology,
Electronics Niketan, 6, CGO Complex, Lodhi Road,
CGO Complex, Pragati Vihar
New Delhi – 110003
7 Comments
Sir kcc status check nahi ho raha
ReplyDeleteOption Not Available wait for it
Deleteबेस्ट माहिती
ReplyDeletekcc - १ रेसिट नाही निकला तो ,कैसे निकाले .
ReplyDeletekcc - १ रेसिट नाही निकला तो ,कैसे निकाले .
ReplyDeleteIf I have previsouly loan of any nationalised bank then can l applicaton for this KCC scheme of Government.
ReplyDeleteCsc me appy karne ke bad KCC kard kaha aur kise kitne din me milega ...
ReplyDelete