मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana | mahadiscom.in
cscvlemitra-Monday, September 13, 2021
मुख्यमंत्री सोलर पंप योजना | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | सोलर पंप योजना महाराष्ट्र |कुसुम योजना सौर पंप योजना महाराष्ट्र | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | mahadiscom.in | pm kusum | Kusum Solar Pump Yojana Maharashtra | Kusum Solar Pump Yojana Online Apply 2021 | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana | Kusum Solar Pump Yojana Maharashtra |
राज्यात अटल सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंप बसविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास शासन निर्णयाने मंजूरी दिली आहे. या योजनेत सौर कृषीपंप 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून पुढील दीड वर्षात पूर्ण करावयाचा असून प्रथम टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंपचे उदिद्ष्ट देण्यात आले आहे.
सौरकृषीपंपाचे फायदे :-
1) दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
2) दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
3) वीज बिलापासून मुक्तता, सौर ऊर्जेचा वापर
4) डिझेल पंपाच्या तुलनेत नो मेंटेनन्स
5) पर्यावरण पुरक ऑपरेटिंग, प्रदूषण नियंत्रण
अर्जाची प्रक्रिया :-
पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
1) महावितरणाच्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
2) सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
3) नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
4) ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत कागदपत्रांची प्रत अपलोड करावी.
A) 7/12 उतारा प्रत
B) आधार कार्ड
C) कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
5) अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
6) ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
7) डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल.
8) प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येईल.
लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष :-
1) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
2) 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
3) वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
4)सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
1) विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
2) अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
3) अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
4) खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
5) कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.
◆ महत्वाचे पॉईंट्स :-
1) योजनेची अंमलबजावणी करतांना लाभार्थ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्याची जबाबदारी महावितरण कंपनीव्दारा निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून खात्री करून घेण्यात येईल.
2) सदर योजनेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया कमी अवधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने महावितरण कंपनीव्दारा ऑनलाईन तयार करण्यात आलेल्या पोर्टलचा वापर करण्यात येईल, ज्यामध्ये अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा असेल.
3) अर्जदाराचे स्थळ परीक्षण ( spot visit ) महावितरण कंपनीव्दारा करण्यात येऊन लाभार्थी निवडीच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
4) राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस योजनेंतर्गत जेथे वीजपुरवठा करण्याकरिता पायाभूत खर्च हा रु.2.5 लक्ष पेक्षा जास्त आहे तेथे वीज ग्राहकांस सौर कृषी पंप देण्याची बाब विचाराधीन आहे.
5) सौर कृषीपंपाचा हमी कालावधी हा 5 वर्षांचा असणे व सोलार मोडयुल्सची वॉरंटी 10 वर्षांची असणे आवश्यक आहे, यासाठी आवश्यक अटींची कंत्राटामध्ये समावेश करण्यात येईल तसेच सौर कृषी पंपासाठी पुरवठादाराकडून 5 वर्षासाठीचा सर्वकष देखभाल व दुरुस्ती करार (रु.100/- च्या स्टँम्स पेपरवर) महावितरणकडून करण्यात येईल.
6) हमी कालावधीत सुरक्षा अनामत/ बँक गॅरंटी महावितरणकडे असल्याने प्रत्येक सेवा पुरविली नाही तर ती रक्कम अशा रकमेतून वसूल करण्यात येईल.
7) तसेच प्रत्येक जिल्हयात दुरुस्ती केंद्र उभारणे व तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहिल.
8) सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यांस हस्तांतरीत करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील.
9) योजनेची अंमलबजावणी करतांना त्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे विहित नमुने, आस्थापना अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र व अनुषंगिक बाबी व तांत्रिक तपासणी नमुना इ. महाविरण कंपनीमार्फत निर्गमित करण्यात येतील.
10) योजनेच्या आर्थिक भारात कोणतीही वाढ न करता लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सौर कृषीपंपासोबत दोन एलईडी डी.सी. बल्ब व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट देण्यात येईल.
◆ वेबसाईटवर उपलब्ध सेवा :-
1) ऑनलाइन अर्ज Online Application
ऑनलाइन अर्ज ही लिंक वापरून लाभार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
2) अर्जाची स्थिती / भरणा Track application status / payment
अर्जाची स्थिती / भरणा ही लिंक वापरून लाभार्थी त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एस.एम.एस. द्वारे प्राप्त झालेल्या लाभार्थी क्रमांकाच्या मदतीने त्याच्या अर्जाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेऊ शकतो.
3) लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती Track application status
“फर्म कोटेशन यशस्वी” असेल तर लाभार्थी अर्जाची स्थिती / भरणा ही लिंक वापरून ऑनलाइन भरणा किंवा महावितरण संकलन केंद्राद्वारे भरणा करण्यास पात्र आहे.
4) ऑनलाइन भरणा ( Online Payment ):-
फर्म कोटेशनच्या ऑनलाइन भरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट्स, कॅश कार्ड्स, यूपीआय सारखे पर्याय आहेत.
5) ऑफलाइन भरणा ( Offline Payment ):-
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत कोटेशनचा भरणा आपल्या भागातील नजिकच्या महावितरण भरणा केंद्रावर देखील उपलब्ध आहे.
6) पुरवठादार बटण ( Search Vendor Button ):-
जर अर्जाची स्थिती / भरणा ह्या लिंकवर लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “भरणा यशस्वी“ ( PAYMENT RECEIVED ) असेल तर पुरवठादार बटण Search Vendor सक्रिय (Activate) केले जाईल व ओटीपी आधारित सिस्टम वापरुन उपलब्ध निवडसूचीतील पुरवठादार निवडता येईल.
निवडसूचीतील उपलब्ध पुरवठादार यादी एजन्सी लिस्ट
7) पंप पुरवठादार निवडतांना जर कोणताही निवडसूचीतील पुरवठादार ( vendors) उपलब्ध नसल्यास, त्या मंडळासाठी त्या क्षमतेच्या पम्पाची निर्धारित केलेली संख्या शिल्लक नाही, असा संदेश लाभार्थीला दिसेल.
8) ऑन होल्ड दस्तऐवज पुन्हा अपलोड करा ( Re-Upload DocumentON-HOLD status ) :-
लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती शोधताना; जर लाभार्थीसाठी सद्यस्थिती “ए 1 फॉर्म सबमिट केलेला आहे” असेल तर अर्जाची सद्यस्थिती टॅब खाली अपलोड दस्तऐवज टॅब दिसेल व लाभार्थ्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या एस.एम.एस. नुसार दस्तऐवज पुन्हा-अपलोड करावे लागतील.
9) संयुक्त सर्वेक्षण नंतर नकार ( REJECTED AFTER JOINT SURVEY ) :-
जर अर्जाची स्थिती / भरणा ह्या लिंकवर लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “संयुक्त सर्वेक्षण नंतर नकार ( REJECTED AFTER JOINT SURVEY ) असेल तर कोटेशनची रक्कम परत मिळविण्यासाठी बँकेच्या तपशीलांसह बँक विवरण गोळा केले जाईल उदा. खाते क्रमांक, बँक आयएफएससी कोड. बँक विवरण ओटीपी आधारित प्रणाली वापरुन लाभार्थ्यांकडून गोळा केले जाईल.
भुजल सर्वेक्षण व विकास यादी एजन्सी लिस्ट
10) मोबाइल नंबरमध्ये बदल ( Change Mobile Number ):-
नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये बदल करावयाचा असल्यास (ए 1 फॉर्म भरताना भरलेला ) संबंधित मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधावा. कॉल सेंटर नंबर /18002333435 वर कॉल करा किंवा वर ई-मेल पाठवा.
11) मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सर्व प्रमुख टप्प्यांसाठी लाभार्थीला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जातो आणि त्याच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ई-मेल पाठविला जातो.
सूचना :- प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेसाठी अर्ज करणा-या सर्व शेतकरी यांना असे आवाहन करण्यात येते की, काही बनावट संकेतस्थळ व मोबाईल अँपव्दारे प्रधानमंत्री कुसुम-ब या योजनेच्या नावाखाली शेतकरी यांना सौर पंप बसविणेसाठी अर्ज भरण्यासाठी तसेच नोंदणी फी आणि पंपाची किंमत ऑनलाईन भरणेसाठी सांगण्यात येत आहे. अशा खोटया/फसव्या संकेतस्थळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैसे
भरणा करू नये.
प्रधानमंत्री कुसुम-ब योजना राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येणार असून सदरील योजना सुरू करतेवेळी याबाबत वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल अधिक माहितीसाठी महाऊर्जाच्या mahaurja.com
महाउर्जा वेबसाईटवर नवीन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
CSC VLE | ASSK | MAHA E SEWA | ऑनलाईन अँप्लिकेशन्स | महाराष्ट्र शासन योजना WhatsApp वर जाईन करण्यासाठी क्लिक करा 👉http://bit.ly/cscvlemitrajoin
0 Comments
Please Do not enter any spam link in comment box.